टोकियो: कोरोना काळात आयोजित करण्यात आलेल्या
टोकियो ऑलम्पिकचा सांगता रविवारी झाली. ओलम्पिकच्या अंतिम क्षणापर्यंत यशस्वी आयोजनासाठी झटणारे यावेळी आयोजकांनी आभार मानले. जपानचे राजे अकिशिनो आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यावेळी उपस्थित होते. सांगता सोहळ्याची सुरुवात व्हिडिओच्या माध्यमातून झाली. यामध्ये 17 दिवसाच्या क्रीडा स्पर्धाचा सारांश दाखवण्यात आला. सांगता सोहळ्यात भारताकडून निवडणूक खेळाडू सहभागी झाले होते. त्यांच्या सोबत 10 अधिकारी उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यात खेळाडूंनी पारंपारिक वेष परिधान केले होते. पण सांगता सोहळ्यात खेळाडूं नियमित ट्रॅक पॅन्ट मध्ये दिसून आले. कांस्यपदक पटकावणार कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताच्या चमूचे नेतृत्व केले. तर सुवर्ण पदक पटकावणारा भालाफेक पटू नीरज चोप्राने ध्वज वाहकाची भूमिका बजावली. त्यांच्यासोबत भारताच्या इतर खेळाडूंनी सांगत सोहळ्याची शान वाढवली.